श्रीक्षेत्र उनपदेव वनक्षेत्रांत वृक्ष लागवडीस प्रारंभ

unapdev tree plantation

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीक्षेत्र उनपदेव येथील राखीव वनक्षेत्र क्रमांक १९७ मध्ये आज कृषी दिनाचे औचित्य साधत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पर्यावरण प्रेमी जितेंद्रकुमार शिंपी आणि पी.आर.माळी यांच्या शुभहस्ते या मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वनपाल आर. एन. खैरनार, वनश्री दशरथ पाटील,वनरक्षक वाय. बी. सोनवणे , एच. बी. सोनवणे ,आर. ए.भुतेकर,संजय माळी,हूसेन तडवी तसेच नवलभाऊ कृषी महाविदयालय अमळनेर चे कृषिदूत अक्षय महाजन,नीला शनमुखा, विकास धनगर,सचिन धनगर,रोहित नाहिदे,प्रीतीश जगताप ,राहुल भुसारी, ऋषिकेश पवार आदींसह निसर्ग प्रेमी ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी करंज,कांचन,शिसु,वायकरण पापडा,आवळा,साग, दिर्घोयुष्यी रोपांची लागवड करण्यात आली. आभार प्रदर्शन वनश्री दशरथ पाटील यांनी केले.

Protected Content