जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे आयोजित हँड वॉशिंग डे चे आयोजन करण्यात आले होते, हात धुण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर हात धुवा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी लोकांना साबणाने हात धुण्याचे महत्त्व सांगत जनजागृती केली जाते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांनी गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल केजी वन च्या चिमुकल्यानचे हाथ धुउन कार्यक्रमाची सुरुवात केली. च.ख.ऊ.उ परिसरा मध्ये इंडस्ट्रियल वर्करांच्या लहान मुलानचे हात धुउन हात धुण्याचे महत्त्व सांगितले त्यानंतर चिमुकल्याना कप केक चे वाटप करण्यात आले. रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट चे समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील आणि प्रदन्या बाविस्कर यांनी या कार्यक्रमा चे आयोजन केले.