चाकूचा धाक दाखवून लूटमार ; दोघा फरार आरोपींना अटक

0
3

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दीनदयाल नगर ,फकीर गल्ली मस्जिदच्या मागे रिक्षा कव्हरची मजुरी देण्यासाठी जात असतांना तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकाविल्याची घटना शनिवारी (ता. २१) रात्री घडली. यासंदर्भात अनिल हनुमानसिंग ठाकूर यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यामुळे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघं फरार आरोपींना बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने आज (ता. २३) अटक केली.

अनिल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ठाकूर हे रिक्षाचे सीट कव्हरची ४ हजार ९०० रुपये मजुरी देण्यासाठी फकीर गल्ली किराणा समोर मोटरसायकल लावून जात होते. त्यावेळी आरोपी अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी (रा.दिनदयाल नगर भुसावळ), जावेद उर्फ पोटली नवाब बागवान (रा.पंचशील नगर) व एक अनोळखी इसम अशानी ठाकूर यांना चाकुचा दाखवून ४९०० रुपये रोख असे मारहाण करुन जबरी ने हिसकावून घेतले . उपविभागीयपोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून आरोपी अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी (वय २८, रा. दिनदयाल नगर) यास दिनदयाल नगर भागातून सापडा रचून ताब्यात घेण्यात आले व अटक करण्यात आली आहे.

तसेच आरोपी जावेद उर्फ पोटली नवाब बागवान (वय २९, रा. पंचशील नगर भुसावळ) यास पंचशील नगर भागातून अटक करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये , पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर , रविंद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव , प्रशांत परदेशी, रविंद्र तायडे, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे अशानी केली असुन पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, पो.काॅ रविंद्र तायडे करत आहे.