चाळीसगावात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी रास्ता रोको; आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी आज बहुजन आझाद सेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी आंदोलकांनी चक्काजाम करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलकांची प्रमुख मागणी होती की, शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. आंदोलनाच्या तीव्रतेची दखल घेत, स्थानिक भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत, लवकरच पुतळ्याचे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले.
यासोबतच, शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एका चौकाचे कामही येत्या 45 दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले. आमदार आणि प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर, आंदोलकांनी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यामुळे चाळीसगावातील वाहतूक पूर्ववत झाली.