भुसावळात महिलांनी स्वखर्चाने केली रस्ता दुरुस्ती

 

bhusaval 3

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्र.२२ येथील सुरभी नगरातील मुख्य रस्त्यांची दैनाअवस्था झाली. यासंदर्भात वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करुन देखील लक्ष देत नसल्याने आज स्थानिक माहिलांनी स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त केला असून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला.

रस्त्यावरील खड्डयांमुळे स्थानिक नागरिक कंटाळाले होते. वारंवार नगरपालिकेला तक्रार करून सुध्दा त्याची दखल नगरपालिकाने घेतली नाही. म्हणून स्थानिक नागरिकांसह महिलांनी स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला आहे. याचबरोबर नगरपालिकाचा निषेध केला. या रस्त्यावरुन शेकडो विद्यार्थी शाळा व कॉलेजमधे जात असतात . सुमारास अर्धा किलोमीटरचा रस्तावर मुरूम टाकण्यात आला आहे. या कामासाठी १६ हजार रू ऐवढा खर्च लागला आहे. या खराब रस्त्यावरुन महिला जात येत असतात याचा फायदा चोरटे उचलतात आणि मंगळसुत्र लांबवण्यासारखे प्रकार घडत असतात म्हणून स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला. या कार्याचे प्रभाग क्र.२२ मधील नागरिकांनी व या रस्त्यावरन ये-जा करणारे नागरिकांनी महिलाचे विषेश आभार मानले. या प्रसंगी निधी जोशी, जयश्री पाटील, शितल पाटील, सुरेखा पवार, वर्षा धांडे, मंदाकिनी चौधरी, पुनम चौधरी, अर्चना पाटील, विजया पाटील, मंगला वाणी, वैशाली महाजन, निकिता जैन, सुनिता तळेले, वारके आदी माहिलांनी मुरुम टाकण्यात सहभाग नोंदविला आहे.

Protected Content