कुस्तीच्या आखाड्यातच हाजी आशिक पहेलवान यांची प्राणज्योत मावळली

lhan death

भुसावळ प्रतिनिधी । मल्ल म्हणून कारकिर्द गाजवणारे हाजी आशीक पहेलवान यांचा आज त्यांनीच आयोजित केलेल्या कुस्तीच्या दंगलीत रेफरी म्हणून काम पाहतांना मृत्यू झाल्याची घटना आज येथे घडली.

भुसावळ मधील खडका चौफुली जवळील केळा ए.सी.गोडावून जवळ दिनांक २६ फेब्रुवारी हाजी ईकबाल पहेलवान काटा कुस्तीच्या शानदार दंगलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी कुस्ती सुरू झाल्यानंतर प्रारंभी लहान मुलांच्या जोड लावण्यात आल्या. तीन कुस्त्या झाल्यानंतर अनिल चौधरी यांना रेफरी साठी हाजी आशिक पहेलवान यांनी बोलविले. या अनुसार ते रेफरी म्हणून काम पाहू लागले. मात्र काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दंगलच्या ठिकाणी खळबळ उडाली. त्यांना तातडीने पोना.रमेश चौधरी यांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले पण काही वेळेतच हाजी आशिक पहेलवान यांची प्राणज्योत मावळली. हाजी आशीक पहेलवान हे प्रख्यात मल्ल होते. तसेच ते जनाधार विकास पार्टीचे नगरसेवक इकबाल पहेलवान यांचे बंधू होते. आयुष्यात अनेक दंगली गाजविणार्‍या आशीक पहेलवान यांचा त्यांना प्राणप्रिय असणार्‍या आखाड्यातच झालेला मृत्यू हा अनेकांचा चटका लावणारा ठरला आहे.

Protected Content