यावल येथे भंगार दुकानात बॅटरीचा स्फोट; चार जखमी

yawal news 5

यावल प्रतिनिधी । येथील एका भंगार दुकानातील इलेक्ट्रॉनीक तोल काटयाच्या बॅटरीचा अचानक स्फोट होवुन चार मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सर्व जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

यावल शहरातील आठवडे बाजार परीसरातील मटण मार्केट शेजारी असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या भंगारच्या मोठया दुकानातील भंगार मोजण्याच्या इलक्ट्रॉनीक तोल काटयामधील असलेल्या बॅटरीचा २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यावेळी भंगारचे ट्रक भरण्यासाठी काम करीत असलेले मजुर नाजीमोदीन शेख सलीम (वय-२७), राजु बराती खाटीक (वय-३८), नासीर खान हाफीज खान (वय-२४) आणि दुकान मालकाचा मुलगा मोहसीन अकबर खाटीक (वय-२३) सर्व रा.यावल हे जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या स्फोटात तोलकाट्यावरील लोखंडी पाटी १२ ते १५ फुट उंचीवर उडाली होती. स्फोटाच्या संपुर्ण परिसरात एक मोठ्या प्रचंड धमाक्याचा आवाज ५०० मिटरपर्यंत झाल्यावर नागरीकांनी त्या घटनेच्या ठीकाणी धाव घेतली. जखमींना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एल.पवार यांनी त्यांच्यावर प्राथमिक औषधी उपचार केलीत. रुग्णालयात घटनेचे वृत कळताच बघणाऱ्या नागरीकांची मोठी गर्दी जखमींना पाहण्यासाठी केली होती.

Protected Content