‘आरोग्य भारती’ची जिल्हा कार्यकारिणी घोषीत; सहसचिवपदी कृणाल महाजन

 

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने संपूर्ण भारतभर समाजाच्या आरोग्यासाठी ‘आरोग्य भारती’ हा आयाम कार्यरत आहे. आज संघ कार्यालयात आरोग्य भारतीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात सहसचिवपदी कृणाल महाजन यांची नियुक्‍ती करण्यात आली.

भारतभर समाजाच्या आरोग्यासाठी ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य भारतीच्या शाखेचा विस्तार करण्यात येत आहे. २६ फेब्रुवारी रोजी संघ कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत जळगाव शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर आरोग्य भारती पश्चिम प्रांत संगठन सचिव मिलिंद ढगे, शहर संघचालक डॉ. विलास भोळे, विभाग कार्यवाह अविनाश नेहेते उपस्थित होते.

बैठकीत मिलिंदजी ढगे यांनी आरोग्य भारतीच्या कार्याची माहिती सर्वांना दिली तर डॉ. विलास भोळे यांनी जळगाव कार्यकारणी जाहीर केली. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. लीना पाटील, उपाध्यक्ष डॉ.चंदन चौधरी आणि डॉ.पराग जहागीरदार, सचिव डॉ. विनीत नाईक, सहसचिव कृणाल महाजन, कोषाध्यक्ष सोमनाथ महाजन आणि महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. शरयू विसपुते यांची नियुक्त करण्यात आली आहे.

कार्यकारणी जाहीर होताच वर्षभरतील आरोग्य संबंधी कार्यक्रमाची मांडणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात आरोग्य भारतीच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा आणि कार्यक्रमांची मांडणी करण्यात येणार आहे. या देशात प्रत्येकाला उत्तम आरोग्य हा मुलभूत अधिकार आहे. मात्र आज ही समाजातील अनेकांपर्यंत आरोग्याच्या उत्तम सुविधा पोहचत नाही किंबहुना सदैव निरोगी राहण्यासाठीचे उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत आहे. यासह अन्य वीस विषयांवर सेवाकार्य करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला पुष्पार्पण आणि धन्वंतरी स्तवन गायन झाले यावेळी सूत्रसंचालन डॉ.पुष्कर महाजन यांनी केले तर शांती मंत्राने बैठक समाप्त झाली.

Protected Content