धानवड गावात दोन गटात तुफान हाणामारी; हे आहे कारण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड गावात ट्रॅक्टर उभे करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार ८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता परस्पर विरोधात एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस यांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड गावात सोमवार ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता ट्रॅक्टर उभे करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये लाठ्या काठ्या आणि फावड्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये अशोक शेणफडू पाटील, रवींद्र नामदेव पाटील, गजानन रवींद्र पाटील आणि कमलबाई नामदेव पाटील हे चौघे जखमी झाले. या घटनेनंतर दोन्ही गटातील अशोक शेनफडून पाटील आणि रवींद्र नामदेव पाटील यांनी एकमेकांविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता पहिल्या गटातील  रवींद्र नामदेव पाटील, गजानन रवींद्र पाटील, महेश रवींद्र पाटील, कमलबाई नामदेव पाटील तर दुसऱ्या गटातील ऋषिकेश अशोक पाटील, प्रशांत अशोक पाटील आणि अशोक शेनफडू पाटील अशा एकूण ७ जणांविरोधात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी करीत आहे.

Protected Content