Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ४ संक्रमित रूग्ण आढळले; ६ रूग्ण कोरोनामुक्त...

कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ४ संक्रमित रूग्ण आढळले; ६ रूग्ण कोरोनामुक्त !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-१ आणि चोपडा -१ असे एकुण ४ बाधित रूग्णआढळून आले आहे. आज ११ तालुका निरंक असल्याचे दिसून आले. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६१३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound