लांडग्यांच्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार

जामनेर प्रतिनिधी-शहराजवळील एका शेतात रात्री आठच्या सुमारास लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

भुसावळ येथील नितेश सुधाकर सुने यांची जामनेर तालुक्यातील महुखेडा शिवारात गट क्रमांक ६७ मध्ये शेती आहे.तेथे सुने यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून काही शेळ्या पाळल्या आहे. काल रात्री ८ वाजेच्या दरम्यान त्याठिकाणी परिसरात वावरणार्‍या लांडग्यांने शेळ्यांंवर हल्ला करून सात मोठ्या शेळ्या व दोन लहान बोकड यांच्या वर हल्ला करून काही मांंस खात एकुण ९ शेळ्यांंना ठार केले. शेतात रखवालीसाठी एक पावरा कुटुंब राहते. पण त्यांना प्रकार लक्षात येईपर्यंत लांडगा हल्ला करून पळून गेला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वन क्षेत्रपाल समाधान पाटील, प्रसाद भारूडे,विलास काळे,उमाकांत कोळी यांनी रात्रीच भेट देवून पंचनामा केला. प्रल्हाद बोरसे,दिपक राजपूत,भारत चौधरी हे यावेळी तिथे हजर होते. या घटनेत शेतकरी सुने पशुधनाचे अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

Protected Content