चाळीसगावात ७१ श्रमिक ‘जलयोद्धे’ पुरस्काराने सन्मानित ; सामाजिक संघटनातर्फे गौरव

817a7208 0cba 41e3 be73 e93b094b5ab4

चाळीसगाव (प्रतिनिधी) नुकतीच चाळीसगाव तालुक्यात सत्यमेव जयते अंतर्गत पाणी फाऊंडेशन ‘वॉटर कप’ स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. यात तालुक्यातील जवळपास ७१ गावांनी सहभाग नोंदविला होता. लहान थोरांपासून तर जेष्ठांपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग घेऊन श्रमदान करीत जलसमृद्धीचा जागर केला. शहरातील महाशब्दे हॉल येथे तालुक्यात जलसमृद्धीसाठी आग्रही राहिलेल्या ७१ श्रमिकांना सामाजिक संघटनातर्फे नुकतेच ‘जलयोद्धा पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले आहे.

 

हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,नगरसेविका सविता राजपूत,सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा,जलसाक्षर अभियानाचे प्रमुख स्वप्नील कोतकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी डॉ.सुनिल राजपूत,डॉ.विनोद कोतकर,सहाय्यक पोलिस निरिक्षक जयपाल हिरे,तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे,पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विजय कोळी,माजी नगरसेवक महेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी पाणी फाउंडेशनचे विजय कोळी, सुनिल पाटील,महादेव मोरे, सुभाष वाघ, माहेश्वरी मासुळे, निलेश पगारे, जितेंद्र पाटील, आकाश गाढवे, मनोज हानोरे, बबलू पाटील, प्रतिभा पुरी यांच्यासह मेहुणबारे पोलिस स्टेशन विभाग, दिपक कच्छवा, निखिल कच्छवा, डॉ.प्रियदर्शनी पाटील, निवृत्ती माळदकर, हेमंत मालपुरे, कैलास कावरे, तुफान खोत, आकांक्षा निकम, अविनाश चंदेले यांना तर रांजणगाव, जामदा, वरखेडे, धामणगाव, रोहीणी, जामदा, नाईकनगर, चिंचगव्हाण, अभोणा, वाघळी, कुंझर, मेहुणबारे, शिदवाडी या गावासह इतर गावांना जलयोद्धा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

 

पुर्वी आपल्या गावाची ओळख ही नदीमुळे होत, असे यात नदीपात्रामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस होतेत आज मात्र आपण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यास मानवनिर्मित अनेक गोष्टी कारणीभूत आहेत हे नाकारुन चालणार नाही. पहिले दुष्काळाचे सावट ग्रामीण भागात होते मात्र आता याच्या झळा शहरी भागात जाणवू लागल्या आहेत. जलयोद्धा ठरलेल्या श्रमिकांनी जलसंधारणासोबत मनसंधारणाचे काम केल्याने भविष्यात दुष्काळ हटल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा दुष्काळ हटावची गगनभेदी घोषणा देत,हातात टिकाव,फावडे घेवून श्रमजीवींनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे डॉ.सुनिल राजपूत यांनी सांगितले.

 

जलक्रांतीची मशाल हाती घेत जलयोद्धांनी श्रमदानाची चळवळ हाती घेतली असून ती सर्वांसमोर आदर्शवत राहिली आहे. आजचा सन्मानरुपी सोहळा हा संवेदनशील आणि प्रेरणादायी राहिला असून जलमित्र आणि श्रमजीवींचा करण्यात आलेला जलयोद्धा सन्मान जबाबदारी वाढविणारा राहणार आहे. प्रत्येक खेड्यात पाणी संचयनासोबत वृक्षारोपणावर भर दिला गेल्यास खऱ्या अर्थाने परिसर सुजलाम व सुफलाम होईल असे डॉ.विनोद कोतकर यांनी सांगितले. तर जयपाल हिरे यांनी आपल्या मनोगतातून परिसर हरित होण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील राहण्यासाठी जागरुक असायला हवे, असे सांगितले तर गावातील श्रमक-यांसह सामाजिक संघटनांनी चळवळ यशस्वीतेसाठी तन मन आणि धन ओतून कार्य केले असल्याचे नमूद केले.

 

यावेळी भडगांव पंचायत समितीच्या माजी सभापती गीता पाटील,पं.स.सदस्या सुनिता पाटील,रांजणगावच्या सरपंच सोनाली निंबाळकर,अनिल नागरे,डॉ.सुनिता घाटे,डॉ.मुकुंद करंबेळकर,नगरसेवक दिपक पाटील,सुरेश स्वार,राजेंद्र चौधरी,सुरेश चौधरी,रवींद्र चौधरी,जिजाऊ समितीच्या सोनल साळुंखे,प्रीती रघुवंशी,योगिता राजपूत,दिपक सुर्यवंशी,राकेश कोतकर,सुधीर चव्हाण,राहुल राजपूत,सुजित पाटील,शेखर निंबाळकर,प्रमोद चव्हाण,श्रीकांत राजपूत,आकाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content