अमळनेर तालुका तलाठी संघातर्फे तहसीलसमोर एक दिवसीय निदर्शने

अमळनेर प्रतिनिधी । ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक यांनी राज्य तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्याला अर्वाच्य भाषा वापरल्याच्या निषेधार्थ आज अमळनेर तालुका तलाठी संघातर्फे तहसीलसमोर एक दिवसीय निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की,  ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटना पदाधिकारी यांच्याबद्दल अर्वाच्च व आक्षेपार्ह विधान केले. जगताप यांनी  केलेल्या विधानाबद्दल तलाठी महासंघाने निषेध व्यक्त केला. असून त्यांची तातडीने बदली करण्यात. दोन दिवसात बदली न झाल्यास १३ ऑक्टोबर पासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  याच्या निषेधार्थ आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी तलाठी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज अमळनेर तालुका तलाठी संघातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या निवेदनावर तलाठी ए. जे. जोगी, आर. टी. दाभाडे, एस. ए. कुलकर्णी, आय. एस. महाजन, एस. एस. मोरे, आर. टी. पाटील, जी.आर. महाजन, पी.प. चव्हाण, पी. एस. पाटील,  एस. बी. बोरसे, जी. वाय. सिरसाठ, प्रकाश महाजन, प्रदीप भदाणे, संदीप शिंदे, बी. एन. काळे, के. एस. चौधरी, श्रीमती आर. जी. गरुड, ज्योती गारूंगे, द्रौपदी भजे, संगीता भोसले, जितेंद्र पाटील, आशिष पारधे, अमोल सोनवणे, एम.आर. पाटील यांच्यासह आधी तलाठी सहभागी झाले होते.

Protected Content