राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची रिपाइंची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना गुरुवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी निवेदन दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षानंतर बुधवारी १५ डिसेंबर रोजी जळगाव महानगरपालिकेत ऑफलाइन पद्धतीने महासभेचे आयोजन केले होते. यात दलित वस्ती निधीवरून खडाजंगी होऊन महापौर कुलभूषण पाटील व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे जळगावच्या विकासाच्या व नागरिकांचे हिताच्या रस्ते, गटारी, आरोग्य, शिक्षण याबाबत नागरिक हे सुखसोयी पासून वंचित असताना संपूर्ण महाराष्ट्रात व देशात अशा प्रकारची वादावादी व दांगडो करून जळगाव शहराचे नाव मलिन करण्यात भर पडलेली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रगीत सुरू असताना दांगडो सुरू केला. त्यामुळे पोलीसांनी सीसीटीव्हीचे फुटेजवरून सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे,  महानगर उपाध्यक्ष तुषार भोई, महेश भालेराव, अनिल लोंढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content