निवृत्त बँक मॅनेजरला तब्बल साडेनऊ लाखाची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना लाखो रूपयाला गंडा घातला जातो. रत्नागिरीमध्येही अशीच एक घटना घडली आहे. यात एका निवृत्त बँक मॅनेजरलाच तब्बल साडे नऊ लाखाला चुना लावण्यात आला आहे. यामागची चोरांची रणनिती थक्क करणारी आहे.

अविनाश श्रीराम वैद्य हे रत्नागिरीत राहातात. ते बॅकेत मॅनेजर म्हणून कामाला होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. एक दिवस त्यांना सावित्री शर्मा बीएलके इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ओमकार रमेशचंद्र भुतडा, होस्ट सानिया या तिघांनी मिळून मोबाईलवरून संपर्क साधला. शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत विश्लेषण केले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष त्यांना दाखवले. 5 फ्रेब्रुवारी ते 16 मे पर्यंत हे लोक वैद्य यांच्या संपर्कात होते. ही सर्व चर्चा ऑनलाईन सुरू होती.

या तिघांनी दिलेल्या अमिशाला वैद्य बळी पडले. शेअर मार्केटमध्ये गुतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असा विश्वास त्यांना वाटला. त्यांनी मग या तिघांच्या खात्यात 9 लाख 50 हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर ज्या कंपनीच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. वैद्य यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या क्रमांकावरून त्यांना फोन आला होता तो बंद होता. वारंवार फोन करून ही काही संपर्क होत नव्हता. शेवटी आपण गंडवलो गेलो आहोत याची कल्पना वैद्य यांना आली.

अविनाश श्रीराम वैद्य यांनी तातडीने रत्नागिरी पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या बरोबर झालेली हकीगत त्यांनी पोलिसांना सांगितली. एक बँक मेनजरही अशा आर्थिक व्यवहारांना गंडू शकतो हे ऐकून पोलिसही चकीत झाले. पोलिसांनीही वैद्य यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तपासही सुरू केला आहे. मात्र अजून कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र वैद्य यांनी अंधळेपणाने विश्वास ठेवत आपली पुंजी त्यांच्या हवाली केली. आता त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

Protected Content