अवैध गौण खनिज वाहतूक पुन्हा सुरु; कारवाईकडे दुर्लक्ष

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर शहरासह परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक पुन्हा सुरु आहे. तहसीलदार यांनी २ आठवड्यापूर्वी अवैध गौण खनिज वाहतूक धडाकेबाज कारवाई करत सात ट्रक्टरे जप्त केले होती. त्यानंतर काही दिवस गौण खनिज वाहतूक बंद होती. परंतु गेल्या तीन दिवासा पासुन परिसरात पुन्हा अवैध गौण खनिज वाहतूक सुरु झाली आहे. याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रावेर परीसरात अवैध गौण खनिज वाहतूक पुन्हा डोकवर काढत आहे.परिसरात ट्रक्टर व छोट्या डंपरच्या सहायाने गौण खनिज वाहतूक सुसाट सुरु आहे. तसेच यासोबतच मुरुम वाहतूक देखिल मोठ्या प्रमाणात सुरु आहे.दोन आठवड्या पूर्वी तहसीलदार यांनी दोन दिवसात ७ ट्रक्टरांवर कारवाई केली होती.या नंतर दोन आठवडे अवैध गौण खनिज वाहतूक पूर्ण पणे बंद होती. परंतु मागील तीन दिसवा पासुन गौण खनिज वाहतूक जैसे-थे झाली आहे. याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी पुन्हा लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुरुमची होतेय विनापरवाना वाहतूक

रावेर परीसरात मुरुमची देखिल विनापरवाना वाहतुक होत आहे. रावेर तहसील मधुन परवाना २ ट्रक्टरांचा काढायचा आणि वाहतूक ४ ट्रक्टरांनी कराची अशीच नविन पध्दत सुरु झाली आहे.तसेच रावेर तालुक्यात दोन डंपरने विना परवाना मुरुम वाहतूक सर्लास सुरु आहे. याकडेही तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Protected Content