अपघातात जखमी हरणाचा मृत्यू ; कारवाईची मनसेची मागणी (व्हिडीओ)

यावल : प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या हरणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला . वन खात्यातील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मनसेने केली आहे

भुसावळ मार्गावरील वाघळुद फाटयाजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या हरणाचा उपचाराअभावी पर्यावरण सप्ताह सुरू असतांना मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे  .

आज यावल ते भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाच वर्ष वयाचे हरिण गंभीर  अवस्थेत पडलेली होती यावल येथील मनसेचे कार्यकर्ते विक्की बाविस्कर यांनी  यावल येथील मिनिडोर चालक प्रशांत बारी याच्यासोबत भुसावळहुन मिनिडोअरमध्ये येत असतांना घटनास्थळावरून हरिणास उचलुन यावल येथील वनविभागाच्या कार्यालयात उपचारासाठी आणले तेथे पश्चीम क्षेत्राचे विशाल कुठे हे हजर होते  त्यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचार करण्याचे सांगीतले त्यांनी एका कर्मचाऱ्यास सांगुन एका कार्यक्रमास जायचे आहे असे सांगुन ते निघुन गेले ,

हरिणावर उपचारासाठी दिड तासापर्यंत वनविभागाकडुन कुठलेही प्रयत्न झाले नाहीत  अखेर त्या हरणाचा तडफडुन मृत्यु झाला  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी संतप्त भूमिका घेतली आहे दुर्लक्ष करणाऱ्यांवर  कारवाई  करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/554967092550860

 

Protected Content