जिल्हा स्तरीय स्मार्टग्राम जाहीर : चिनावल व तरवाडेला विभागून पहिला क्रमांक !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हास्तरीय स्मार्टग्राम योजनेतील विजयी गावांची घोषणा जिल्हा परिषदेच्या निवड समितीकडून करण्यात आलेली आहे. यात चिनावल (ता. रावेर) व तरवाडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) या दोन्ही गावांना विभागून पहिला क्रमांक मिळाला आहे.

यात सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरावरील ङ्गस्मार्टग्रामम या ४० लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी रावेर तालुक्यातील चिनावल आणि चाळीसगावातील तरवाडे बु. या गावांची निवड झाली आहे. या दोन्ही गावांना योजनेसाठी असलेल्या १०० पैकी समान ८२ गुण मिळाल्याने दोन्ही गावांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

सन २०१९-२० या वर्षासाठी चिनावल आणि तरवाडे बु. या गावांची निवड झाली. सन २०१८-१९ या वर्षासाठी अमळनेर तालुक्यातील एकतास आणि भुसावळ तालुक्यातील खंडाळा या गावांना १०० पैकी ७९ एवढे समान गुण मिळाले आहेत. या दोन्ही गावांना या वर्षासाठी जिल्हास्तरावरचे बक्षीस विभागून दिले जाईल. सन २०१७-१८ या वर्षासाठी बोदवड तालुक्यातील मानमोडी आणि पाचोर्‍यातील वडगाव कडे या दोन्ही गावांना प्रत्येकी ८४ गुण मिळाल्याने या गावांना जिल्हास्तरीय पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे.

दरम्यान, या योजनेसाठी जिल्हास्तरावर ४० लाख रुपयांचे तर तालुकास्तरावर निवड झालेल्या गावांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

तालुकास्तरावर तीन वर्षांसाठी निवड झालेली गावे हे खालीलप्रमाणे आहेत.

अमळनेर : दहिवद एकतास सुंदरपट्टी; भडगाव : मडगाव बात्सर अंजनविहिरे; भुसावळ : कठोरे बु. खंडाळा साकेगाव; बोदवड : साळसिंगी, मुक्तळ, मानमोडी; चाळीगाव : तरवाडे बु. ब्राम्हण शेवगे, देवळी; चोपडा : चहार्डी अकुलखेडा, घुमावल; धरणगाव : सोनवद, रोटवद, अंजनविहिरे; एरंडोल : खर्ची बु. रवंजे बु. उत्राण गु.ह.; जळगाव : जळगाव खुर्द, तरसोद, सावखेडे बु.; जामनेर : देऊळगाव, मोराड, पळासखेडा बु.; मुक्ताईनगर : कोथळी, पिंप्रीनांदू, कर्की; पाचोरा : निपाणे, बांबरूड प्र.बो, वडगाव कडे; पारोळा : दळवेल, देवगाव, द.सबगव्हाण; रावेर : चिनावल, भाटखेडा, रोझोदा; यावल : नायगाव, म्हैसवाडी, उंटावद

Protected Content