जय किरण प्रभाजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल

पाचोरा,-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची इयत्ता दहावीच्या १०० टक्के यशाची परंपरा सलग ११ व्या वर्षी ही कायम राखली आहे.

विद्यालयातून प्रथम क्रमांकाने कु. लिशा भाऊसाहेब बोरसे ९५.२० टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय क्रमांकाने चि. राघव मिलिंद साळुंखे ९३.८० टक्के व तृतीय क्रमांकाने कु. ऊर्जा धमेंद्र धाडीवाल ९३.४० टक्के गुणांनी हे विदयार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुळकर्णी, सचिव जीवन जैन, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य पुष्पलता पाटील, सी. ई. ओ. अतुल चित्ते पर्यवेक्षिका विद्या थेपडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content