पी. बी.ए इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पी.बी.ए. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा यंदा देखील १०० टक्के निकाल लागला आहे.

एस.एस.सी वर्ष २०२२.२३ परीक्षेचा निकाल हा नाशिक बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून पी.बी.ए इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षेत निर्भळ उत्तुंग गगन भरारी घेणारे असे स्वरूपाचे यश संपादित केले आहे. सर्वांना सार्थ अभिमान प्राप्त करून देणारा हे यश आपण म्हणू शकतो. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गगनात मावेनासा आनंद प्राप्त झालेला दिसून आला. प्रथम पाच उच्च श्रेणीमध्ये प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे गुण प्राप्त प्रतिशत टक्केवारी

सदर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य व यशाशक्ती स्वरूपाची मदत शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती,मुख्याध्यापक जे. एस.देवरे,पर्यवेक्षिका एम.एस.बारी,महेश माळी,व्ही.पी.बडवे,व्ही.एस. अमृतकर,श्रवण पाटील,अशोक महाजन,प्रशांत वंजारी, राजश्री दाभाडे समस्त शिक्षक वृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवृंद वर्ग यांचे लाभले.

दरम्यान, विद्यालयातून प्रथम पाच मध्ये आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

१) प्रितेश मगरे ९६%
२) सिद्धेश शिरोळे ९५.८०%
३) आर्या आवनकर ९४.४०%
३) सुचिता यादव ९४.४०%
४) ओम साळुंखे ९४%
५) सोनाली लोहार ९३.६०%

या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content