जिल्ह्यातील नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर : जाणून घ्या कुठे कोणती वर्गवारी निघाली !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आगामी नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत आरक्षण काढण्यात आले असून यात जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचातींचा समावेश देखील आहे.

आज सायंकाळी मंत्रालयात आरक्षण काढण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, धरणगाव, यावल, रावेर, सावदा, फैजपूर या नगरपालिका आणि मुक्ताईनगर, भडगाव, नशिराबाद, शेंदुर्णी या नगरपंचायतींमध्ये निवडणुका होत असल्याने येथे नगराध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले. यात खालील प्रकारे आरक्षण निघाले आहे.

नगरपालिका

भुसावळ- अनुसुचित जाती महिला

चाळीसगाव- जनरल खुले

अमळनेर- अनुसूचित जमाती

पारोळा- जनरल खुले

एरंडोल- अनुसूचित जमाती

पाचोरा- महिला सर्वसाधारण

जामनेर- खुला महिला

चोपडा- ओबीसी महिला

धरणगाव- महिला सर्वसाधारण

यावल-  महिला सर्वसाधारण

रावेर- महिला सर्वसाधारण

सावदा- अनुसुचीत जाती महिला

फैजपूर– महिला सर्वसाधारण

नगरपंचायती

मुक्ताईनगर- महिला सर्वसाधारण

भडगाव- अनुसुचीत जमाती महिला

नशिराबाद– ओबीसी सर्वसाधारण

शेंदुर्णी– जनरल खुले

वर नमूद केल्यानुसार नगराध्यक्षपदांचे आरक्षण निघाले असून लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तर आता नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे रणधुमाळीस खऱ्या अर्थाने सुरूवात होणार असल्याचे मानले जात आहे.