वक्फ संशोधन कायदा रद्द करा; कौमी एकता फाउंडेशनचे निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संसदेत गाजलेल्या वक्फ संशोधन विधेयकाचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याला कौमी एकता फाउंडेशनने असंवैधानिक ठरवत तो त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. संस्थेच्या वतीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठवण्यात आले आहे.

निवेदनात संस्थेचे अध्यक्ष शेख कुर्बान यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेला हा कायदा अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या वक्फ केलेल्या संपत्तीवर गदा आणणारा आणि त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. सरकारने आणि संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) या कायद्यावर पुन्हा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. जर हा कायदा रद्द केला नाही, तर कौमी एकता फाउंडेशन घटनात्मक मार्गाने आंदोलन करेल आणि सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करून लढा देईल. असे देखील निवेदनात नमूद केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेख कुर्बान, सचिव सय्यद जावेद, कलीम खान, जमलोद्दीन, शेख वसीम, जैद पिंजारी, शेख तौफिक, अख्तर पहेलवान यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या कायद्याला विरोध दर्शवत तो रद्द करण्याची मागणी केली.

Protected Content