वयोवध्द व्यक्तीच्या खिश्यातून मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाजवळील रोडवरून सेवानिवृत्त व्यक्तीच्या खिश्यातून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अल्पवयीन मुलाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दासोपंत सुका भंगाळे (वय-६४) रा. सदोबा नगर हिरापाईप जळगाव हे बसआगारातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील नवीन बी.जे. मार्केटसमोरील भंगार बाजारातील जुने इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या ठिकाणी उभे होते. त्यावेळी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्याजवळ येवून मागून खिश्यातून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला.  याप्रकरणी दासोपंत भंगाळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!