सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील मधुकर पाटील यांचा गौरव करण्यात आला. मुद्रांक व नोंदणी विभागात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०१.८३ टक्के महसुली इष्टांक साध्य करून जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित यश गौरव सोहळ्यात मुद्रांकजिल्हाधिकारी सुनील पाटील यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
या सोहळ्याला आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोर पाटील तसेच जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुद्रांक व नोंदणी विभागाने अविरत प्रयत्न करून महसुलात लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे विभागाने राज्यात आपले स्थान भक्कम केले आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुद्रांकजिल्हाधिकारी पाटील यांच्या कार्यशैलीचे व त्यांच्या टीम च्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.