जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे स्टेशन परिसरातून एकाची पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हिलाल इदवे (वय-४४) रा. त्रिभुवन कॉलनी, कानडदा रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नोकरीसाठी ये-जा करण्यासाठी (एमएच १९ डीसी ८३४) क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी आहे. २३ एप्रिल रोजी ४.३० शिवाजीनगरातील रेल्वे पट्टाजवळ असलेल्या आरआरआय केबिन जवळ त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रवींद्र इदवे यांनी बदुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली. परंतु कुठेही मिळून आले नाही. यानंतर अखेर त्यांनी मंगळवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाहीत प्रफुल्ल धांडे करीत आहे.