रब्बी पिकांसाठी पाणी सोडा ; शेतकऱ्यांचे शोले आंदोलन

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देऊळगाव राजा तालुक्यातील रब्बी पिकांसाठी संत चोखा मेळा प्रकल्पाचे पाणी सोडावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देऊळगाव मही येथील उंच पाण्याच्या टाकीवर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

रब्बी हंगाम सुरू झाला आहे. परंतु शेतकऱ्यांना संत चोखामेळाच्या पाण्याचे पहिले रोटेशन २२ डिसेंबर रोजी सोडण्यात आले. जवळपास ४० दिवस रब्बी हंगाम पेरणी उशिरा झाली. शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त २ रोटेशन पाणी मिळाले. दुसरे रोटेशन  संपून जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पीक पाण्याअभावी करपून चालले आहे. संबंधित विभागांतर्गत असलेल्या उपविभागीय अभियंत्यांकडे विचारणा केली असता थकीत पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी सोडता येणार यांच्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थकलेली पाणीपट्टी शेतकरी पाणी पट्टी आकारणी बिल मिळाल्यानंतर भरतील. सद्य:स्थितीत सिंचनाकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, पाणी त्वरित सोडण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे सुरेश यांच्या नेतृत्वात देऊळगाव मही शहरातील फिल्टर प्लांट पाण्याच्या टाकीवर असंख्य शेतकऱयांनी शोले आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

 

Protected Content