आदर्श शिक्षकांची एक आगाऊ वेतनवाढ पूर्ववत करा – ना. बच्चू कडू यांच्याकडे मागणी

भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटना जळगावच्या वतीने सन २०१९ पासून जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ पूर्ववत सुरु करण्यात यावे या आशयाचे निवेदन राज्य मंत्री ना. बच्चू कडू यांना देण्यात आले. ते जिल्हा दौऱ्यावर शुक्रवार दि. २७ मे रोजी आले असता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, ४ सप्टेंबर २०१८ च्या शासन परिपत्रक अन्वये जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ बंद करण्यात आलेली आहे. ही वेतनवाढ शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना वेतनवाढ देण्यात येत होती. जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यासोबत शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून आदर्श शैक्षणिक कार्य व गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर २०१८ चा शासन निर्णय आता अंशत:बदल करून बंद केलेली वेतनवाढ पूर्ववत सुरु करण्यात यावी. यासाठी मंत्री ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना जिल्हा अध्यक्ष, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटना जळगाव समाधान जाधव, सचिव गोविंद वंजारी, महिला प्रमुख लीना अहिरे, विजय निंभोरे, पद्माकर पाटील, प्रवीण मोरे, अतुल पाटील, प्रदीप साखरे, सुरेश अहिरे ही शिक्षक मंडळी उपस्थित होती.

Protected Content