रयत सेना विधायक कार्यात अग्रेसर – हभप ज्ञानेश्वर माऊली

चाळीसगाव, प्रतिनिधी | रयत सेना विधायक कार्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन ह.भ. प ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे. ते तालुक्यातील बेलदारवाडी येथे रयत सेना दिनदर्शिकेचे प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.

चाळीसगाव येथील सामाजिक संघटना रयत सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसंगी महामंडलेश्वर १००८ ह.भ. प ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते तालुक्यातील बेलदारवाडी येथे करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, रयत सेनेचे कार्य कौतुकास्पद आहे. संघटनेत तरुण एकत्रित आल्याने चांगले समाजसेवेचे कार्य घडते. एकत्रित याव मात्र कोणाला बडविण्यासाठी नव्हे तर ते घडविण्यासाठी आले पाहिजे. घडविण्याचे विधायक कार्य रयत सेना करत आहे. संघटनेत जे तरूण आहेत. ते सर्व व्यसनमुक्त आहेत. जे माणसे उद्योगी असतात त्यांना व्यसन असल्यास त्यांना पैसा पुरेसा पडत नाही. म्हणून उद्योगी असताना व्यसनमुक्त असले पाहिजे तरच ते विश्व निर्माण करू शकतात. आळसा सारखा शत्रू नाही आणि उद्योगा सारखा मित्र नाही. म्हणून उद्योगा सारखा मित्र जवळ असला तरच आपली प्रगती होते. रयत सेना नेहमी समाजाच्या हिताच्या विधायक कार्यात नेहमी अग्रेसर असते. त्यांच्या हातून चांगले कार्य सातत्याने घडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले की चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त गोरगरीब बांधवांना किराणा किट व ब्लँकेटचे वाटप केले. काही ग्रामस्थांना घर संसाराचे साहित्य मदत म्हणून दिले. आरोग्य शिबिरे घेऊन पूरग्रस्त महिला, लहान मुले, नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधी वाटप केली. सर्वसामान्य नागरिकांचे आधार लिंक मोफत करून दिले. गोरगरीब जनतेची सढळ हाताने मदत रयत सेनेच्या वतीने करून सामाजीक भान जोपासत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे , शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, छोटू अहिरे, दीपक देशमुख, शुभम अहिरे तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार. प्रकाश पाटील , कुलदीप पाटील, यांच्या सह विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे भिकन पवार, कोदगाव ग्रा. प. सदस्य, सोमनाथ पवार , बेलदारवाडी ग्रा पं सदस्य ज्ञानेश्वर कुमावत,दिपक कुमावत, युवराज कुमावत , संजय कुमावत, नंदू कुमावत , कृष्णा कुमावत, रमेश कुमावत, अरुण कुमावत, रेवन माळी आदी उपस्थित होते.

Protected Content