पाचोरा येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त व “ईद ए मिलादुन्न नबी” या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध भागातून भव्य रॅली काढण्यात आली.

 

गुरुवार दि. ७ आॅक्टोबर रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त बोहरा समाजाचे अध्यक्ष अब्दुलकावर यांच्या अध्यक्षतेखाली रॅली काढण्यात आली. या रॅलीत कासमभाई लाकडावाला, शब्बीर लोखंडवाला, हातीम लाकडावाला, मा. नगरसेवक दत्तात्रय जडे, वासुदेव महाजन, सुधाकर महाजन, अनिल सावंत, अजहर खान सह चिमुकले, तरुण, तरुणी, समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात बोहरा गल्लीपासुन सुरूवात होऊन गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, देशमुखवाडी भागातुन काढण्यात आलेल्या रॅलीत समाज प्रबोधनपर गीत वाजवत तसेच तरुणांनी हातात शिक्षणावर आधारित फलक घेऊन जनजागृतीचा संदेश दिला. रॅली यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव, बुऱ्हानी गार्डस् यांनी परिश्रम घेतले. यावेळी बुऱ्हानी गार्डस् यांनी परिधान केलेला विशेष पेहराव रॅलीचे आकर्षण ठरले.

Protected Content