Murder detection : दारू पिण्यास हटकले; अन् जीवानिशी गेले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण तलावाजवळ दारू पित असलेल्या तरूणांना हटकल्याच्या कारणावरून दिनेश भिकन पाटील (वय-४४) रा. रामेश्वर कॉलनी याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी घडली होती. या गुन्ह्यातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यापैकी एकजण अल्पवयिन आरोपी आहे.

दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय-२१) रा. तांबापूर आणि एक १५ वर्षीय अल्पयीन मुलगा असे अटकेतील संशयित आरोपींचे नावे आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, दिनेश भिकन पाटील (वय-४४) रा. रामेश्वर कॉलनी हे सुप्रिम कॉलनी नोकरीला होते. रामेश्वर कॉलनी पत्नी व मुलीसह वास्तव्याला होतो. शनिवार ९ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ते मेहरूण तलावाजवळील डॉ. राजेश जैन यांच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या एका नाल्याजवळ ते दुचाकी (एमएच १९ बीएक्स १४९७) ने आले आणि दारू पिण्यासाठी बसले. त्याच ठिकाणी बाजूला दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय-२१) रा. तांबापूर आणि एक १५ वर्षीय अल्पयीन मुलगा देखील दारू पित बसले. त्यावर दिनेश पाटील यांनी एवढ्या लहान वयात दारू पिताय तुम्ही उठा येथून असे हटकले. याचा राग आल्याने दोघांनी दगडाने ठेचून खून करून पसार झाले.

 

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या गोपनिय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, पो.ना. राहूल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, भारत पाटील, विजय चौधरी, दर्शन ढाकणे यांनी संशयित आरोपी दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय-२१) रा. तांबापूर आणि एक १५ वर्षीय अल्पयीन मुलगा यांना तांबापूरा परिसारातून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content