शेतातील किरकोळ कारणांवरून मुलांसह महिलेला मारहाण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे शेतातील किरकोळ कारणांवरून मुलांसह महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, “लिलाबाई गणसिंग पाटील या अतीक पाटील आणि प्रमोद पाटील तसेच सुनबाई यदनाबाई पुडलीक पाटील यासह विरावली येथे वास्तव्यास आहेत.

आज रविवार, दि.१७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. लिलाबाई गणसिंग पाटील या शेतातील वाड्यात असताना गावातील किशोर आत्माराम निळे याने यांच्या चाऱ्याच्या कुटीवरुन ट्रॅक्टर नेले. याविषयी लिलाबाई यांनी विचारले असता जीवे मारण्याची धमकी देली.

यावर लिलाबाईच्या अतीक पाटील व प्रमोद पाटील या दोन्ही मुलं किशोर निळे यास जाब विचारत असल्यावर चेतन सुनिल धनगर, हेमत किशोर धनगर, सुनिल आत्माराम धनगर, आत्माराम दोधु धनगर हे असे सर्वजण पळत आले.

त्यावेळी चेतन धनगर याच्या हातात विळा व हेमंत धनगर कोयता तसेच सुनिल धनगर हातात काठी घेऊन आले आणि त्यानी लिलाबाईसह मुलाना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली..

यात पुंडलिक गणसिंग पाटील याच्या उजवे हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली वेळीच काही लोकांनी धावत आवराआवर करत हेमंतच्या हातातील कोयता हिसकविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

लिलाबाई गणसिंग पाटील (रा.विरावली, ता.यावल) यांच्या फिर्यादीवरून किशोर आत्माराम निळे, चेतन सुनिल धनगर, हेमत किशोर धनगर, सुनिल आत्माराम धनगर, आत्माराम दोधु धनगर सर्व रा. विरावली ता. यावल याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यावल पोलीस पुढील तपास करत आहे.

Protected Content