एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या केमिकल कंपनीला आग (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी  घडली. मनपाच्या एक अग्निशामन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली असून या आगीत कंपनीच्या परिसरातील लाकूड व गवत जळून खाक झाले.

शहरातील एमआयडीसी परिसरातील डी-सेक्टमध्ये मनोहरलाल जमनदास यांच्या मालकीची लिड्स स्कॅप केमिकल नावाची कंपनी आहे. ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेली असल्याने कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. तसेच या कंपनीच्या मागे रामेश्वर कॉलनीचा रहिवासी परिसर आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड देखील असल्याने आज सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या परिसरातील वाढलेल्या गवताला आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामन विभागाचे कर्मचारी प्रकाश चव्हाण, पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, गंगाधर कोळी यांनी तात्काळ बंब घेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे अर्धातास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कंपनीतील वेस्ट मटेरियल व लाकूड जळून खाक झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/785389675708967

Protected Content