संजय गरुड यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती

शेंदूर्णी प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय गरुड यांची जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्ती मुळे जामनेर तालुक्यातील रखडलेल्या प्रलंबित व नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडिसी) मधून निधी खेचून आणता येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे नियुक्ती मुळे जामनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्यपदी निवड झाल्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या नियोजनात आपली छाप पाडता येईल.

 

Protected Content