केंद्रासह राज्याच्या करांमध्ये कपात : पेट्रोल कंपन्यांकडून दर कपातीस राज्य सरकारला ठेंगा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्र सरकारने इंधनाच्या अबकारी करात कपात केली तर राज्यातील मविआ सरकारने दबावामुळे काही प्रमाणात व्हॅटच्या करात कपात केल्याचे जाहीर केले, परंतु अद्यापही राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नसल्याने कंपन्यांनी एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारच्या आदेशाला ठेंगाच दिला आहे.

केद्र सरकारने मे महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात इंधनाच्या अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल डिझेलचे दर८ ते १० रुपयांनी कमी करीत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने देखील दाबवाखाली येत अल्प प्रमाणात व्हॅटच्या करात कपात केली. त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून २३ मे नंतर इंधनाचे दर कमी होणे अपेक्षित होते, परंतु पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. तसेच व्हॅट कर असल्याने कदाचित ३१ मे नंतर त्याची अंमलबजावणी होईल असाही अंदाज लावण्यात आला होता. परंतु १ जून रोजी दर तेच असून त्यात बदल झालेले नाहीत. यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला पेट्रोल कंपन्यांनी एकप्रकारे ठेंगाच दाखवला आहे.

 

Protected Content