रासायानिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करा – मनसेचे कृषीमंत्र्यांना पत्र

यावल, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिक पेरणीनंतर लागणारी रासायनिक खतांची वाढलेली किंमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे, याबाबत मनसेने कृष्णमंत्र्यांना पत्र देऊन वाढलेल्या खतांच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी केली आहे. 

 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन, ५० किलोच्या बॅगवर सुमारे ६०० ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता १oo ते २oo रूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते. पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिक पेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन, या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन, शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

Protected Content