विदगाव तापीपुलावरून अनोळखी तरूणाची उडी घेवून आत्महत्या

vidagaon pul

यावल प्रतिनिधी । विदगाव गावाजवळ एका तरूणाने दुचाकी पुलावर थांबूवन पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोळनाव्ही (विदगाव) गावाच्यापुढे तापी नदीच्या पुलावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास २० ते २२ वर्षी तरूण स्वत:ची दुचाकी क्रमांक एमएच १९ – ६१२२ ने आला. दुचाकी पुलावर पार्कींग करून सरळ तापी नदीच्या पुलावरून उडी मारली. दरम्या आत्महत्या केलेला तरूण हा कोण व कुठला आणि कशासाठी आत्महत्या केली याबाबत कोणतीही माहीती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान घटनास्थळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. आज जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

Protected Content