प्रथमच दुसऱ्यांदा कोरोना बाधा झालेल्या रुग्णाची नोंद !

बंगरुळु वृत्तसंस्था । देशात दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण प्रथमच आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयानं दुसऱ्यांदा करोना झालेला रुग्ण आढळून आल्याचा दावा केला आहे.

देशात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध सैल केले जात असतानाच रुग्णसंख्येत काळजीत भर टाकणारी वाढ होत आहे. आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बंगळुरूतील हा पहिलाच रुग्ण असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. बंगळुरूतील फोर्टीस रुग्णालयानं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार २७ वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे. दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळून आलेली महिलेमध्ये जुलैमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळून आली होती.

महिलेला ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर महिला उपचाराच्या साहाय्यानं करोनातून बरी झाली. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पहिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, एका महिन्याच्या कालावधीनंतर त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पुन्हा करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, असा दावा रुग्णालयानं केला आहे.

Protected Content