पाचोरा, प्रतिनिधी | मागील पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये हाती घेतलेली विकास कामे पुढील पाच वर्षांच्या काळामध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा एकदा आ.किशोर पाटील यांना मत देवून विजयी करा, असे आवाहन येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील यांनी एका पत्राद्वारे नागरिकांना केले आहे.
या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या अडीच ते पावणेतीन वर्षांच्या कार्यकाळात मी नगराध्यक्ष म्हणून पाचोरा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी जी विकास कामे या शहरांमध्ये करू शकलो, त्यामागे निश्चितपणे तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांचा मोठा वाटा आहे. आ.पाटील यांनी संघर्ष करून आणलेल्या निधीचा जर पाठिंबा नसता तर आधुनिक पाचोरा शहराच्या निर्मितीची पायाभरणी झाली नसती. किशोर आप्पांनी सूक्ष्म नियोजन करून शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये समन्वय साधत शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला. त्या आराखड्यानुसार शहरातील दशकापासून अस्तित्वात असलेली व जीर्ण झालेली स्मशानभूमी जागा पुन्हा नव्याने उभी केली. ज्या वाचनालयामध्ये जाऊन शहरातील आपल्या भावा बहिणींनी ज्ञान, जिज्ञासा वाढवली त्या वाचनालयात जेव्हा उतरती कळा लागली तेव्हा सदरचे वाचनालय नव्याने भव्य स्वरूपामध्ये बांधून जनतेला अर्पण केले. त्यांच्याच प्रयत्नांनी राजीव गांधी टाउन हॉलच्या जागेवर सुमारे १० कोटी रुपयांची सुसज्ज इमारत ठेकेदाराकडून बी.ओ.टी. तत्वावर उभी राहिली आहे. जिनिंग परिसराही व्यवसायिकांसाठी दोन मजली व्यापारी संकुल उभे केले. यातून नगरपालिकेला वर्षाला लाखो रुपये कर मिळेल व नगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील, अशी व्यवस्था केली आहे.