जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आ.जावळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

raver

रावेर प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदार संघातून आज आजी-माजी मंत्री पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आमदार हरिभाऊ जावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील मानाचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरावर माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह उमेदवार आ. जावळे यांनी गणपतीचे विधीवत पुजन व आरती केले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात येवून तहसील कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणूकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. प्रचंड घोषणाबाजी व शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक तहसील कार्यालयात आल्यावर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी माजी जि.प. शिक्षण सभापती सुरेश धनके, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, रिपाइ जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन उपस्थित होते. आ.जावळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजप जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नेते सुरेश धनके, हिरालाल चौधरी, मसका चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, व्हाइस चेअरमन भागवत पाटील, हरीश गणवानी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर भाजप तालुका अध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्ष योगिराज पाटील, युवासेना शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, सुरेखा कोळी, शिव सेना जिल्हा उपप्रमुख तुशार उर्फ मुन्ना पाटील, तालुका अध्यक्ष रवी सोनवणे, रिपाइ जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुका अध्यक्ष गणेश पवार, तालुका अध्यक्ष अरुण गजरे, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार, रावेर पस सभापती माधुरी नेमाडे, यावल पं.स. सभापती पल्लवी चौधरी, जि.प.सदस्य नंदा पाटील, रंजना पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील, पी.के.महाजन भाजप, संदीप सावळे शिवसेना, महायुतीचे सर्व जि.प. पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आघाडी अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, लोप्रतिनिधी, पेज प्रमुख, शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, कार्यकर्ते, महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content