पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय संपादन करत भाजपचा बालेकिल्ला उध्दवस्त केला आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ मतदारसंघात त्यांच्या कुटुंबातील सदस्याला टाळून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर मैदानात उतरले. या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात अनेक वादग्रस्त घटना घडल्या. यामुळे येथून नेमकी कोण बाजी मारणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पोस्टल मतांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली तरी ती पुरेशी ठरली नाही. यामूळे भाजपचा पारंपारिक मतदारसंघ कॉंग्रेसने हिसकावून घेतला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.