जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना एक लाखाची मदत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रूपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजूरी दिली आहे.

दरम्यान शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत ९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २७ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची प्रकरणे पात्र तर ९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.

पात्र शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content