कसब्यातून धंगेकर तर चिंचवडमधून जगताप यांना आघाडी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे रवींद्र धंगेकर आणि अश्‍वीनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे.

भाजपचे कसबा पेठ आणि चिंचवडचे आमदार अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अलीकडेच मतदान झाले होते. या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आणि सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली. पहिल्यांदा पोस्टल मते मोजण्यात आली. तर, नंतर इव्हीएमच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार, पोस्टल मतमोजणी आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. यानुसार कसब्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना तर चिंचवडमधून भाजपचा अश्‍वीनी जगताप यांना आघाडी मिळाली आहे. यात मध्यंतरी हेमंत रासने यांना थोडी आघाडी मिळाली असली तरी तिसर्‍या फेरीअखेर धंगेकर यांना सुमारे अकराशे मतांनी आघाडी कायम असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content