रावेर प्रतिनिधी । शहरातील डॉ. आंबेडकर चौकात अचानक कोरोना अँटीजन टेस्ट तपासणी अभियान राबविण्यात आले. यावेळी १७८ नागरिकांची तापसणी करण्यात आली असून २ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे असे शासनाचे प्रमुख अधिकारी एकत्र येऊन नगरपालिका कर्मचारी व वैधकीय स्टाफ तसेच ईश्वर महाजन माऊली हॉस्पिटल टेक्निशियन यांचे मदतीने कोरोना तपासणी केली असता 178 तपासणी खेळू असता 2 पॉझिटिव्ह आले असून कोव्हीड सेन्टर रावेर येथे दाखल केले आहे.
कोरोना दिवसेंदीवस वाढतच असून विनाकारण कोणीही घराचे बाहेर निघु नये,अन्यथा प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे,कोणीही विनाकारण भटकणार नाही,आपापल्या घरीच सुरक्षित रहा,शासनाचे नियमाचे पालन करा असे आवाहन करण्यात येत आहे.रावेर शहरात रात्रीच्या वेळी पोलिस प्रशासना कडून विनाकारण बाहेर फिरणा-या नागरीकांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.स्वता: पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे जनतेला टेस्ट करून घेण्याचे अवाहन करीत आहे.