कोरोना : राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलल्या ; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे, तर खासगी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता राज्यात येऊ घातलेल्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

 

महाराष्ट्रात आज करोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६५ वर्षीय एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने करोनामुळे राज्यभरात होणाऱ्या सर्व निवडणुका लांबवणीवर टाकल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Protected Content