रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाल येथून वाळू वाहून नेणार्या चार ट्रॅक्टरवर तहसीलदार बंडू कापसे यांनी कारवाई केल्याने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाल (ता. रावेर) येथील सुकी नदी पात्रातुन अवैध वाळु वाहतूक करणारी चार ट्रक्टरे तहसिलदार बंडू कापसे यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.काल सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.यामुळे वाळू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पाल येथील सुकी नदीतुन वाळु घेऊन आलेले चार ट्रक्टरांवर तहसीलदार बंडू कापसे परवीक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.विशेष बाब म्हणजे आता पर्यंत तहसीलदार यांच्या पथकाने दोन दिवासापूर्वी तीन ट्रक्टरांवर कारवाई केली होती.आज पुन्हा चार ट्रक्टरांवर कारवाई केली आहे.
यामध्ये १) एमएच १९ बि जी ६९३० तर तीन विना नंबर प्लेट ट्रक्टरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी पाल निलेश धांडे, रावेर मंडळ अधिकारी यासीन तडवी, खिरोदा प्र यावल जे डी बंगाळे, खानापुर मंडळ अधिकारी विठोबा पाटील, निंभोरा दिपक गवई, तलाठी पाल गुणवंत बारेला, खानापुर तलाठी गोपाळ भगत, रावेर तलाठी स्वप्नील परदेशी, सावखेडा तलाठी निलेश चौधरी आणि कोतवाल गणेश चौधरी यांचा सह पोलिस कर्मचारी यांचा सहभाग होता.