चिन्याच्या मृत्यू प्रकरणात कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांची नोंदविण्यात आली साक्ष

जळगाव प्रतिनिधी । कारागृहातील बंदीवान चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा जेलर व त्याच्या सहकार्‍यांच्या मारहाणीत मृत्यु झाल्याचा आरोप चिन्याच्या कुटुंबियांनी केला असल्याने याप्राणाची न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणाशी निगडीत असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष झाल्यानंतर आज जळगाव कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड याची साक्ष जिल्हा न्यायालयातील न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली.

जळगाव शहरातील शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये रवींद्र उर्फ चिन्या जगताप हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता. दरम्यान 11 सप्टेंबर रोजी चिन्या जगतापचा संशयास्पद मृत्यू झाला. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी यांच्यासह संबंधित दोषींवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप हिने केल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष नोंदविल्या नंतर आज जळगाव जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस गायकवाड याची साक्ष जिल्हा न्यायालयातील न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली. चिन्या जगताप मृत्यू प्रकरणात अनेक जणांची साक्ष नोदविण्यात आली आहे.

Protected Content