पिंपरखेड विकास चेअरमनपदी हटकर; बडगुजर व्हा. चेअरमन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरखेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खंदे समर्थक धोत्रे येथील लक्ष्मण तुकाराम हाटकर व व्हा. चेअरमन पदी आत्माराम गुलाब बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपरखेड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विद्यमान चेअरमन यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर धोत्रे येथील लक्ष्मण हटकर यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. धोत्रे हे गाव पिंपरखेड विकास सोसायटीमध्ये सामील गाव आहे. विकास सोसायटीच्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच धोत्रे या लहानशा गावाला चेअरमन पदाचा मान मिळाला.

दरम्यान, चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या निवडी प्रसंगी भडगाव येथील श्री आमले, विकास सोसायटीचे सचिव दिनेश पाटील, भरत पाटील यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी विकास सोसायटीचे संचालक हरीश पाटील, नितीन पाटील, रवींद्र बडगुजर ,विश्वासराव भोसले हिरामण माळी, मनोज पाटील, संजय पाटील, वाल्मीक पाटील, ज्ञानुरांम निकम,सौ वैशाली पाटील सौ. आशाबाई बडगुजर इ.संचालक मंडळ उपस्थित होते.

 

याप्रसंगी अंचळगाव चे सरपंच विद्याधर पाटील, बापू पाटील,अविनाश पाटील, शेखर भोसले, रविंद्र पाटील, बापू पाटील, तसेच धोत्रे येथील विरभान पाटील,रामदास हटकर, बालू पाटील, दगडू हटकर, सुभाष पाटील, आत्माराम हटकर, विठ्ठल धनगर, शांताराम हटकर, नवल हटकर, धोंडू हटकर व  गावाचे ग्रामस्थ, मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर होते.

Protected Content