आघाडी सरकारची कामे दाखवून आमदार-खासदारांनी फसवणूक केली: सोपान पाटील यांचा आरोप

रावेर प्रतिनिधी । आमदार हरीभाऊ जावळे व खासदार रक्षाताई खडसे यांनी आघाडी सरकारची कामे जनतेला दाखवून फसवणूक केली असल्याचा सनसनाटी आरोप आज राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

सोपान पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट आमदार हरीभाऊ जावळे व खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर हल्लाबोल केला. रावेर विधानसभा मतदारसंघात २५८ कोटीचे विकास कामे केल्याची माहिती नुकतीच आमदार हरीभाऊ जावळे यांनी माध्यमांना दिली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या केलेल्या विकास कामांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चांगलाच समाचार घेण्यात आला.त्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा केल्याचा आरोपी उपस्थित विरोधकांकडून करण्यात आला. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,शहराध्यक्ष महमुद शेख,गणेश बोरसे,किरण तायडे,पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते

ही तर आघाडी सरकारची कामे

रावेर मतदारसंघात आणलेले २५८ कोटीचा फुसका बार असुन आमदारांनी दाखविलेल्या विकास कामांमध्ये रावेर शहरातील क्रीडा संकुलन,रावेर पंचायत समिती,शासकीय गोडाऊन ही सर्व कामे राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारच्या काळातील असुन आमदारांनी मी केल्याचे जनतेला दाखविले आहे. तर भोर- पुनखेडा-पातोंडी रस्ता अस्तित्वातच नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

खासदारांची कामे दाखवा

दरम्यान, खासदार रक्षाताई खडसे यांनी दाखविलेल्या विकास कामांमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्हीचा निधीचा खर्च दाखविन्यात आला आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी कोणते विकास कामे केली आहे हे जनते समोर सांगण्याचे अवाहन यावेळी करण्यात आले. रावेर तालुक्याचे जिव्हाळीचे प्रश्‍न अंतर्गत कलहामुळे प्रलंबित राहल्याचा आरोप यावेळी विरोधकांकडून करण्यात आला.

Add Comment

Protected Content