पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी भा.ज.प.ची उद्या बैठक

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली भव्य प्रचंड जाहीर सभा जळगाव येथे महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ रविवार १३ ऑक्टोंबर रोजी होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी उद्या गुरुवार १० ऑक्टोबर रोजी पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

store advt

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या नियोजनासाठी उद्या दिनांक १० ऑक्टोंबर गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता जी. एम. फौंडेशन (शिवाजी महाराज पुतळ्या समोर) येथे भा.ज.पा पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ना. गुरुमुख जगवानी, खा.उन्मेष पाटील, उमेदवार निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, मंडल पदाधिकारी विविध आघाड्यांचे अध्यक्ष , सरचिटणीस, सर्व नगरसेवक, शक्तीकेंद्रप्रमुख, कायम निमंत्रि सदस्य यांनी हजर रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी यांनी प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, महेश ठाकूर यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!