खुशखबर : मंगरूळ धरण भरले, ओसंडून वाहू लागले पाणी !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील भोकरी नदीवरील मंगरूळ मध्यम प्रकल्प मध्यरात्री पूर्ण भरला असून तो ओसंडून वाहू लागला आहे.

रावेर तालुक्यात काल पासुन सुरु असलेल्या पावसामुळे मंगळुर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असुन रात्री दोन वाजता ओव्हर फ्लो होऊन लेव्हल पेक्षा दहा सेंटीमीटर वरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. भोकर नदीवरील या धरणामुळे परिसरातील सुमारे १२ गावांमधील शिवारांना लाभ होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण भरल्याने परिसराला दिलासा मिळाला आहे.

रावेर तालुक्यात काल पासुन हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडत होता.तर दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली तर रात्री तीन वाजे पासुन संततधार पाऊस सुरु आहे.याला फायदा मंगळुर धरणला झाला आहे.पावसामुळे कुठेही नुकसान झाले नसुन तालुक्यात पहील्यांदाच दमदार पाऊस कोसळत आहे.या पावसमुळे पिकांना मोठा फायदा होणार असून तालुक्यातील भूमिगत पाणी पातळीत देखिल वाढ होण्याची शक्यता आहे.

Protected Content